महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील अपंग पुनर्वसन संस्थेतर्फे जागतिक अपंग दिनानिमित्त दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात दिव्यांगांनी मिळवलेल्या यशाचा गौरव हा प्रेरणादायी असल्याचे उद्गार मान्यवरांनी काढले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पायमल, मंजुषा आडके, राष्ट्रीय खेळाडू किरण बावडेकर, अजय वणकुर्दे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अंध गायक सिद्धराज पाटील, तबला वादक रोहन लाखे, दिव्यांग लघु चित्रपट दिग्दर्शक निखील कुंडले, अर्जुन पुरस्कारप्राप्त जलतरणपटून स्वप्नील पाटील, शुक्ला बिडकर, सोनम पाटील, सुमित कुरणे, आदित्य पाटील यांचा सत्कार झाला.
संस्थेचे विश्वस्त दत्तात्रय मामूलकर, उमा पवार, विलास मोरस्कर, सुधाकर पाटील, संजय पाटील, विनोद कोरवी, राजू परिते, अनिता काकडे उपस्थित होते. संस्थेचे सचिव बापूराव चौगुले यांनी आभार मानले.