महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये श्री महालक्ष्मी-राजर्षी शाहू आघाडीने 17 पैकी 17 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला . महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन (डीएई १३६) शाखा कोल्हापूर व विस्तार अधिकारी संघटना प्रणित श्री शिवशाहू आघाडी आणि श्री महालक्ष्मी - राजर्षी शाहू आघाडी यांच्यामध्ये दुरंगी लढत झाली होती. या निवडणुकीत सत्तारुढ श्री शिवशाहू आघाडीला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत ग्रामसेवक पतसंस्थेमध्ये सत्ता बदल झाला. श्री महालक्ष्मी-राजर्षी शाहू आघाडीचे नेते के.आर.किरुळकर, साताप्पा मोहिते, काकासो पाटील हे विजयाचे किंगमेकर ठरले
ग्रामसेवक पतसंस्थेच्या जागेसाठी शनिवारी (१४ जानेवारी) मोठ्या चुरशीने मतदान झाले शिवाजी पार्क परिसरातील विक्रम हायस्कूल येथे सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत झालेल्या मतदानात शंभर टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. ग्रामसेवक पतसंस्थेचे ६३१ मतदार आहेत. सगळ्या सभासद मतदारांनी मतदान केले.मोठ्या चुरशीने मतदान झाल्यामुळे निकालाकडे लक्ष लागून होते. श्री शिव शाहू आघाडीचे नेतृत्व एन. के. कुंभार, गौतम कांबळे, के.टी. सितप, बाबासाहेब कापसे यांनी नेतृत्व केले. श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्व किरळकर व मोहिते यांनी केले.
श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीच्या उमेदवारांना प्राप्त मते: अजित सिताराम राणे 336 मते, साताप्पा अण्णाप्पा कांबळे 339 , दीपक बळवंत पाटील 338, श्रीकृष्ण दशरथ कांबळेे 334 , दीपक गोविंद परीट 335, संदीप चंद्रकांत धनवडेे 331 , विजयसिंह कृ. रजपूत 340, आनंदा यशवंत कदम 340, विनोद भारत पाटील 343, संजय पांडुरंग सावेकर 345, उदय राजाराम पानारी 339, संदीप शिवाजी चौगुले 342, दयानंद नारायण मोटुरे 355 , बळवंत दादू पाटील 330, सारिका महादेव बंडगर 336, माधुरी भगवानराव साळुंखे 339 मते मिळाले आहेत. या निवडणुकीत के आर किरळकर व साताप्पा मोहिते यांच्या नेतृत्वाखालील श्री महालक्ष्मी राजर्षी शाहू आघाडीने दणदणीत विजय मिळवला. तर श्री शिवशाहू आघाडीचा पराभव झाला. शिवशाहू आघाडीच्या उमेदवारांना प्राप्त मते : सम्राट सतीश रानगे 287 , रामचंद्र कृष्णा पाटील 284, अनिल विष्णू पाटील 286, संदीप शिवाजी साठे 289, यशवंत शिवाजी कुंभार 287, शिवाजी पांडुरंग गायकवाड 283, किशोर विठोबा पाटील 297, राजेंद्र नामदेव भोपळे २८९, राजू भाऊसो जाधव 289, शिवाजी गणपती चौगुले 284, अमर रामचंद्र बांदल 284, भीमराव रामचंद्र गुरव 291, प्रमोद तुकाराम गायकवाड 287, लक्ष्मण कृष्णात पाचगावेे 275 , सुरेश राजाराम गुरव 301, अश्विनी मच्छिंद्र कांबळे 291, रूपाली नेताजी पाटील 277 मते मिळाली.