+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Jan 23 person by visibility 330 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : श्री क्षेत्र सिद्धगिरी कणेरी मठ संस्थान कडून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव २० ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होत आहे. या महोत्सवात सर्व शासकीय विभागांच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती देणारे प्रदर्शन स्टॉल लावावेत. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व प्रत्येक विभागाला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेश पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव तथा पंचमहाभूत महोत्सवाचे नोडल अधिकारी प्रवीण दराडे यांनी दिले.
          जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीत दराडे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मठाचे प्रतिनिधी संतोष पाटील, उदय सामंत, माणिक चुयेकर यांच्यासह मुंबई येथील पर्यावरण विभागाचे अन्य अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
    कोल्हापूर महापालिकेने त्यांच्याकडील शहर वाहतूक बसेसची व्यवस्था महोत्सव कालावधीत किमान दहा दिवस दहा बसेस कणेरी मठ ते कोल्हापूर शहर लोकांचे दररोज ने-आण मोफत करण्यासाठी उपलब्ध करुन द्याव्यात. यासाठी आवश्यक असणारा निधी पर्यावरण विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याप्रमाणे परिवहन राज्य महामंडळाने त्यांच्याकडेही अशा पद्धतीने राखीव बसेस ठेवाव्यात व प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्या उपलब्ध करुन द्याव्यात, असेही त्यांनी सुचित केले.
     दरम्यान दराडे यांनी सुमंगल पंचमहाभूत महोत्सवाच्या अनुषंगाने कणेरी मठ परिसराला भेट दिली. काडसिद्धेश्वर स्वामी यांनी महोत्सवाच्या सुरु असलेल्या सर्व कामांची माहिती दिली. यावेळी  दराडे यांनी ज्या विभागांची कामे अपूर्ण आहेत ती कामे त्वरित पूर्ण करण्याबाबतचे निर्देश शासकीय यंत्रणेला दिले. त्यानंतर १९ फेब्रुवारी २०२३  रोजी पंचगंगा नदी घाटावर महाआरती होणार असल्याने त्या ठिकाणची पाहणी ही दराडे यांनी केले.