+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 288 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
 डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचना शास्त्र विभागाच्या (अॅनाटाॅमी) कॅडव्हरिक बायोस्कील लॅबतर्फे शनिवार दि. २१ जानेवारी रोजी डोळ्यांच्या रचनेवरील अभ्यासावर सुवर्ण महोत्सवी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. देशातील निवडक नेत्रविकार तज्ञ या कार्यशाळेत सहभागी होणार असल्याची माहिती शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ. वसुधा निकम यांनी दिली.
 या लॅबमध्ये आतापर्यत मेंदू, खांदे, हाडे, आर्थोस्कोपी, सांधे व गुडघे यांच्या अभ्यासासंदर्भात झालेल्या विविध कार्यशाळामध्ये १८०० हून अधिक डॉक्टर्सनी प्रशिक्षण घेतले आहे. शनिवारी होणाऱ्या ५० व्या कार्यशाळेच्या यशस्वीततेसाठी मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. आशालता पाटील, डॉ. वसुधा निकम, डॉ. अनिता गुणे, डॉ. अरुण करमरकर, आनंद बंडगर हे विशेष मेहनत घेत आहेत.
 संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, अभिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली व शरीररचना शास्त्र विभागाच्या सर्व सहकाऱ्याच्या सहकार्यातून या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.