+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule25 May 23 person by visibility 207 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)चेअरमनपदी अरुण गणपतराव डोंगळे यांची एकमताने निवड झाली.
सहकारी संस्था (दुग्ध पुणे विभाग) विभागीय उपनिबंधक व निवडणूक अधिकारी डॉ.महेश कदम यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या बैठकीत निवड झाली. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ प्रधान कार्यालयात बैठक झाली.
गोकुळमधील सत्ता बदलानंतर पहिले दोन वर्षे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी चेअरमनपदाची धुरा सांभाळली. निवडणुकीतील सत्तापॅटर्ननुसार दोन वर्षाच्या कालावधीनंतर विश्वास पाटील यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला. पाटील यांच्यानंतर डोंगळे यांना चेअरमनपद देण्याचे ठरले होते. गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, विनय कोरे, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतही डोंगळे यांच्या चेअरमनपदाबाबत एकमत होते.
चेअरमन निवडीसाठी गुरुवारी (ता.२५ मे) संचालकांची बैठक झाली. चेअरमनदासाठी डोंगळे यांच्या नावाला संचालक विश्वास पाटील हे सूचक तर संचालक नविद मुश्रीफ अनुमोदक आहेत. डोंगळे यांची एकमताने निवड झाली. याप्रसंगी संचाालक अभिजीत तायशेटे,अजित नरके, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, श्रीमती अंजना रेडेकर, कर्यकारी संचालक योगेश गोडबोले आदि उपस्थित होते.