+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule26 May 23 person by visibility 234 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राज्यातील खाजगी प्राथमिक अनुदानित शाळातील शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी व राष्ट्रीय वेतन योजना धारकांना सातवा वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्याबाबतचे आदेश तातडीने द्यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
   सरकारने ९ मे २०२२ रोजी शासकीय कर्मचारी व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील तिसरा हप्ता सदर कर्मचाऱ्यांच्या फंडात व सेवानिवृत्त व एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना रोखीने देण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. सदरच्या आदेश खाजगी अनुदानित शाळांना लागू असून एक वर्ष उलटून गेले तरी खाजगी शाळातील शिक्षक ,सेवानिवृत्त कर्मचारी व एनपीएस धारकांना सदरचा हप्ता मिळालेल्या नाही._ 
    सरकारने२४ मे २०२३ रोजी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतील चौथा हप्ता देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. तरी खाजगी अनुदानित शाळातील कर्मचाऱ्यांचा मागील तिसऱ्या हप्त्यासह चौथा हप्ता जमा करण्याचे आदेश राज्याचे शिक्षण संचालक यांनी सर्व शिक्षणाधिकारी तथा वेतन पथक अधीक्षकांना द्यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
     मागणीचे निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी स्वीकारले.यावेळी महासंघाचे राज्यसचिव राजेंद्र कोरे व विभागीय सचिव राजाराम संकपाळ उपस्थित होते.