+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 283 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी हकोल्हापूर : 
येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या श्रीमंत शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने बीजीएम स्पोर्ट्सचा 3 विरुद्ध 0 गोलने पराभव केला. दुसऱ्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर 4 विरुद्ध 2 गोलने विजय मिळवला. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
पाटाकडील आणि बीजीएम स्पोर्ट्स यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात बीजीएमने पाटाकडीलला रोखल्याने मध्यंतरास सामना शून्य गोलबरोबरच होता.
 उत्तरार्धात पाटाकडील तालमीचा झंझावात सुरू झाला. व्हिक्टर जॅक्सनने 45 व्या मिनिटाला पहिला गोल नोंदवा 60 व्या मिनिटाला रोहित देसाईने दुसरा गोल करत संघाची स्थिती भक्कम केली. जादा वेळेत व्हिक्टर जॅक्सनने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करत पाटाकडीलच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पाटाकडील कडून व्हिक्टर जॅक्सन, रोहित देसाई , ओमकार मोरे, ऋषिकेश मेथे तर बीजीएमकडून वैभव राऊत, ओपेरा, संकेत जरग, फ्रान्सिस यांनी चांगला खेळ केला.
पहिल्या सामन्यात सम्राटनगर स्पोर्ट्सने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर चार विरुद्ध दोन गोलने विजय मिळवला. सामन्याच्या अकराव्या मिनिटाला यासीन नदाफने गोल करत सम्राटनगर संघाचे खाते खोलले. 32 व्या मिनिटाला ऋणमुक्तेश्वरच्या सोमेश पाडळकरने मैदानी गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला. 35 व्या मिनिटाला सम्राटनगरच्या निरंजन कामतेने गोल केला. मध्यंतरास सम्राट नगर संघ दोन विरुद्ध एक गोलने आघाडीवर होता. 
उत्तरार्धात सम्राटनगरच्या मिलन डायमंदेने 49 आणि 69 व्या मिनिटाला मैदानी गोल करत सम्राटनगर संघाला भक्कम स्थितीत नेले. ज्यादा वेळेत ऋणमुक्तेश्वर युनुस पठानने गोल केला.
गुरुवारचे सामने
झुंजार क्लब वि. उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, दुपारी दोन वाजता.
 प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ, दुपारी चार वाजता.