महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर '
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून दोन चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंदाजे एक लाख रुपये किमतीच्या चार मोटरसायकली जप्त केल्या.
रेकॉर्डवरील मोटरसायकल चोर हॉकी स्टेडियम येथे येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यांनी सापळा रचून संदीप मनोहर कांबळे (वय 32) आणि सुहास दिलीप कांबळे (वय 28, दोघे रा.विचारेमाळ झोपडपट्टी ) यांना ताब्यात घेतली दोघांनी मंगळवार पेठ, कागल, निपाणी येथून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी चारही मोटरसायकल जप्त केल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या नेतृत्वाखाली फौजदार नेताजी डोंगरे,पोलीस अंमलदार श्रीकांत मोहिते, संजय इंगवले, महेश खोत, अमर शिरढोणे, संजय पडवळ, संतोष पाटील, सुरेश पाटील यांनी कारवाईत भाग्य घेतला.