+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन
Screenshot_20240226_195247~2
schedule25 Jan 23 person by visibility 475 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी (२६ जानेवारी २०२३ ) कोल्हापुरातील फुटबॉल संघाचे  खेळाडू, फुटबॉल संघ व्यवस्थापक आणि पंच यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.        फुटबॉल खेळाच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे, मनामध्ये वैरभावना असू नये या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाला फुटबॉल खेळाशी निगडीत विविध घटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. आपल्यातल्या त्वेषाला तिलांजली देवू या... कोल्हापूरच्या फुटबॉलसाठी एकत्र येऊ या" या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे  फिरंगाई तालीम मंडळाचे रविकिरण इंगवले यांनी सांगितले. 
  फिरंगाई तालमीजवळ सकाळी नऊ वाजता प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.