+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Sep 22 person by visibility 729 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याची घोषणा पतसंस्थेचे चेअरमन सुभाष धाडवड यांनी केली.
पतसंस्थेच्या ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.याप्रसंगी बोलताना चेअरमन धाडवड यांनी कर्जाचा व्याजदर साडेनऊ टक्के इतका केल्याचे त्यांनी सभेत घोषित केले. या सभेत पतसंस्थेसाठी नवीन वास्तु घेतल्याबद्दल सभासद डॉ. अजितकुमार पाटील यांनी अभिनंदनाचा ठराव केला. तानाजी पाटील,कुलदीप जठार, संदीप सुतार, संतोषकुमार कदम, सुनील पाटील, द्रोणाचार्य पाटील, युवराज सरनाईक, उत्तम कुंभार, सुभाष माने, संभाजी कबाड़े यांनी चर्चेत सहभाग घेतला.
संस्थेचे सचिव सुधाकर सावंत यांनी अहवालाचे वाचन केले.  सभेस व्हाइस चेअरमन सरीता सुतार,खजानीस उमेश देसाई, वसंत आडके, उत्तम गुरव, संजय पाटील, संजय कडगावे, प्रकाश पाटील, शिवराज नलवडे, राजेंद्र गेंजगे, मनोहर शिंदे, शकील भेंड़वाडे, विजय माळी, विजय जाधव, दिलीप माने, नयना बडकस, शकुंतला मोरे उपस्थित होते. मनोहर सरगर यांनी आभार मानले.