+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 23 person by visibility 576 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी हकोल्हापूर : 
येथील विवेकानंद कॉलेज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने भूगोल दिन उत्साहात साजरा झाला. भूगोल दिनानिमित्त प्रदर्शनाचे आयोजनही केले होते. त्याचा लाभ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि भूगोल प्रेमींनी घेतला. शाळेच्या वतीने पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला.
  विद्यालयामध्ये विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भौगोलिक उपकरणे मांडण्यात आली होती. ज्वालामुखीची रचना, नकाशे, पर्जन्यमापक उपकरण, इंटरनेट मॅप, हवामान अंदाज मॉडेल, भूगोल विषयक पुस्तके यांची मांडणी करण्यात आली.सर्व विद्यार्थ्यांना सर्व उपकरणांची माहिती देण्यात आली. भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. जी. एस. उबाळे यांनी भूगोल दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ एस एस काळे, धीरज पाटील, ऐश्वर्या हिंगमिरे यांनी भूगोल विषयाचे महत्त्व स्पष्ट केले. दैनंदिन जीवनामध्ये भूगोल विषयाचा वापर कसा होतो याची माहिती ही विद्यार्थ्यांना दिली. भूगोल प्रश्नमंजुषा उपक्रमामध्ये विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
पत्रकारितेत उल्लेखनीय काम केलेल्या पत्रकारांचा संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीराम साळुंखे यांनी पत्रकारितेचे महत्त्व आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते पत्रकार सतीश घाटगे, यशवंत लांडगे, कृष्णा पुरेकर, सुनील पाटील,धनाजी भिवशेकर, राहुल व्हटकर, मंगेश कोरे यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार सतीश घाटगे आणि यशवंत लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी मुख्याध्यापक जे. आर. जोशी, ज्येष्ठ शिक्षिका मीना मोहिते, बी एस कांबळे, एस. पी. जाधव उपस्थित होते. ए.के. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. सौ एस. आय. चौगुले आभार मानले.