+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 975 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गायींमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्याचा प्रयोग गोकुळ दूध संघात करण्यात आला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन प्रकल्प अंतर्गत गायीमध्ये गर्भ प्रत्यारोपण करून उच्च वंशावळीच्या फक्त मादी वासरांची पैदास करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एनडीडीबीमार्फत गोकुळ संलग्न दूध संस्थेमध्ये पुढील तीन वर्षासाठी निवडक पाचशे जनावरांमध्ये गर्भ प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गायी आणि दुसऱ्या टप्प्यात म्हशी यांच्यावर आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भ प्रत्यारोपण होणार आहे. शिवाय गायी-म्हशींच्या गर्भधारणांची खात्री आता फक्त 28 दिवसात होणार आहे. किटद्वारे हे तपासणी होणार आहे.
 ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या कार्यालय परिसरात शनिवारी एक ऑक्टोबर रोजी एका गायींमध्ये गर्भ प्रत्यारोपण करत उच्च वंशावळीच्या मादी वासरांची पैदास करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला‌. त्यासाठी एनडीडीबीचे अधिकारी दाखल झाले आहेत. गोकुळ दूध संघाचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. 2022-23 या वर्षांमध्ये गायींचे चाळीस गर्भ व म्हशीचे 110 असे एकूण 150 गर्भ मंजूर झाले आहेत. या प्रकल्पामुळे दूध उत्पादकांच्या गोठ्यामध्ये कमी कालावधीत म्हणजेच एका पिढीमध्ये उच्च शाळेचे जातिवंत व फक्त मादी वासरांचे पैदास होणार आहे.
या तंत्रज्ञानाद्वारे जन्माशनारी वासरे उच्च वंशावळची असून त्यांचे दूध उत्पादन गायीमध्ये प्रति वेत 6000 लिटरपेक्षा अधिक  तर म्हशीमध्ये प्रतिवेध 4000 लिटरपेक्षा अधिक राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या दूध उत्पादकांना संघाच्यावतीने खर्चाच्या 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, या कार्यक्रमांतर्गत गर्भ प्रत्यारोपण करण्यासाठी 21 हजार रुपयेचा खर्च आहे.जनावर गाभण राहण्याची खात्री झाल्यानंतर प्रत्येक जनावरांसाठी केंद्र सरकारकडून 5000 तर गोकुळ दूध संघाकडून 7000 रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित रक्कम लाभार्थी दूध उत्पादकांच्या दूध बिलातून कपात करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण 500 गर्भ प्रत्यारोपणासाठी गोकुळ दूध संघामार्फत 25 लाख इतके अनुदान दूध उत्पादकांना देण्यात येणार आह.एनडीडीबीचे अधिकारी एस पी सिंह, गोकुळचे अधिकारी डॉ. उदयकुमार मोगले, डॉक्टर प्रकाश दळवी यांनी गर्भ प्रत्यारोपण कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच गोकुळच्या अधिकाऱ्यांनी गाई म्हशींच्या गर्भधारणांची खात्री आता फक्त आठ दिवसात होऊ शकते ते सांगितले यापूर्वी गर्भधारणेची खात्री करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागत असे. परंतु आयडेक्स लॅबोरेटरी अमेरिका या कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती केलेल्या गर्भ तपासणी केंद्र द्वारे 28 दिवसात गर्भधारण्याची खात्री करणे सोपे झाले आहे. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्पादकांना 25 टक्के अनुदानावर गाई म्हशींच्या गर्भधारणाची खात्री करून घेता येणार आहे तरी सर्व दूध उत्पादक संस्थांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन गोकुळने केले आहे. यावेळी ज्येष्ठ संचालक अरुणकुमार डोंगळे, शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे , नावीद मुश्रीफ, सुजित मिणचेकर, अजित नरके, अभिजीत तायशेटे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, रणजीत पाटील, एस आर पाटील, प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगुले, प्रा. किसन चौगुले, बयाजी शेळके,अंजना रेडेकर, नंदकुमार डेंगे, युवराज पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग विभागाचे हनुमंत पाटील आदी उपस्थित होते..