+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Nov 22 person by visibility 324 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ग्रामपंचायपत व सहकारी संस्थांच्या एकाच कालावधीत होत असल्यामुळे सहकार विभागाने नवा आदेश काढला आहे. निवडणुका जाहीर झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाला २० डिसेंबर २०२२ पर्यंत स्थगिती दिली आहे. सहकार विभागाच्या या आदेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील इतक्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्या आहेत. सहकार विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी, ग्रामसेवक पतसंस्था आणि गडहिंग्लज अर्बन बँकेसह २१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या.
राज्य निवडणूक आयोगामार्फत सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २० डिसेंबरपर्यंत सात हजार एकावन्न ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. याच कालावधीत सहकारी संस्थांच्या निवडणुकांचाही कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणमार्फत अ,ब, क आणि ड वर्गातील मिळून ७,१४७ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. ग्रामपंचायत आणि सहकार विभाग या दोन्ही निवडणुकींचा एकच कालावधी, सहकारी संस्थांचे सभासदत्व यामुळे मतदानापासून मतदार वंचित राहण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकारच्या सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सहकारी संस्थांच्या निवडणुका वीस डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे आदेशात म्हटले आहे.