+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Jan 23 person by visibility 473 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची निवड २५ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.
 करवीरचे सहाय्यक निबंधक तथा निवडणूक अधिकारी बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहामध्ये निवड प्रक्रिया होणार आहे.  सोसायटीची यंदाची निवडणूक श्री महालक्ष्मी सहकार आघाडी व विरोधी राजर्षी शाहू स्वाभिमानी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत झाली. २१ जागेसाठी ४२ उमेदवार रिंगणात होते. सोसायटीच्या निवडणुकीत श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकल्या. सलग दुसऱ्यांदा श्री महालक्ष्मी सहकार सत्तारुढ पॅनेलने सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळवला.
 चेअरमनपदासाठी संचालक रणजीत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित आहे. पाटील दुसऱ्यांदा सोसायटीवर निवडून आले आहेत. सेवा चतुर्थ श्रेणी गटातून ते विजयी झाले आहेत. पशुसंवर्धन विभागात परिचर आहेत. त्यांच्या निवडीची औपचारिकता शिल्लक आहे. तर व्हाईस चेअरमनपदी कोणाला संधी मिळते याकडे लक्ष आहे.