+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule13 Aug 22 person by visibility 465 categoryमहानगरपालिका
महापालिका हद्दीतील गांधी मैदानावरील पाणी निचरा करण्यासाठी महापालिकेला तीन कोटींचा निधी मंजूर
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :-पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लॉंग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या उपाययोजनांसाठी शासनाकडून आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल,
 मुंबईत एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
      जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित जिल्ह्यातील पूर परिस्थिती आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके उपस्थित होते. धैर्यशील माने यांनी ऑनलाईनद्वारे सहभाग घेतला.जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मुख्यमंत्री व लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्‍या सूचनांप्रमाणे आराखडा करून शासनाला लवकर सादर करण्यात येईल, असे सांगितले.
……………….
मुख्यमंत्री म्हणाले…
पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी निवारा केंद्रे सुरु करावीत. निवारा केंद्रांमध्ये लोकांसाठी सरकारतर्फे जेवणासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. पुरामुळे स्थलांतरित होणाऱ्या एकूण गावांची संख्या व त्या गावातील लोकांसाठी योग्य ठिकाणी कायमस्वरुपी रिलीफ कॅम्प निर्माण करण्यासाठी जागा शोधून ते निर्माण करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.
..................
गांधी मैदानसाठी तीन कोटी

महापालिका हद्दीतील गांधी मैदानावर पावसाचे व पुराचे पाणी जाते. या पाण्याचा निचरा होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तीन कोटी रुपये निधी महापालिकेला देण्याचे जाहीर केले व हे काम तात्काळ पूर्ण करुन या भागातील नागरिकांना दिलासा देण्याची सूचना केली.