+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Jan 23 person by visibility 1270 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल व पुणे येथील घरावर ईडीने छापेमारी केली आहे. बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासूनच ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकले. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त समजताच समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली. मुश्रीफ यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.मात्र मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. बुधवारी सकाळी ईडीच्या पथकाने घरावर छापा टाकला. या पथकात 25 अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे माहिती कळते. माजी मंत्री मुश्रीफ हे सध्या मुंबई येथे आहेत. दरम्यान मुश्रीफ त्यांच्या समर्थकांनी सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यातील घोटाळासंबंधी ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. मुश्रीफ हे मंत्री असताना हा कारखाना ब्रिक्स या कंपनीला देण्यात आला होता. या सगळ्या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा घोळ झाला आहे. भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा यामध्ये गुंतवला असा आरोप सोमय्या यांनी केला होता. ईडीच्या अधिकाऱ्याच्या पथकाने सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. दरम्यान मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जून 2019 मध्ये इन्कम टॅक्स खात्याने छापा टाकण्यात आला होता. दरम्यान मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर टाकण्यात आलेल्या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. दुसरीकडे मुश्रीफ यांच्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कागल बंदची हाक दिली आहे.