+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule06 Nov 22 person by visibility 361 categoryलाइफस्टाइल
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धा- २०२२-२३ 'नाट्यरंजन' च्या यजमानपदाचा बहुमान कोल्हापूरला मिळाला आहे. आंतर परिमंडळीय नाट्यस्पर्धेतील विजेते नागपूर, औरंगाबाद, कोंकण व पुणे या प्रादेशिक विभागाचे नाट्यसंघ कोल्हापूरात होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेत सहभागी होणार आहेत.  संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १० व ११ नोव्हेंबर २०२२ रोजी हा सोहळा रंगणार आहे, अशी माहिती आयोजक तथा कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी दिली आहे.
 राज्यातील १६ परिमंडळासाठी संबंधित प्रादेशिकस्तरावर केले जाते. या पहिल्या फेरीत प्रथम क्रमांकाचे विजेते ठरलेले नाट्यसंघ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी आहेत. दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत कोविड- १९ मुळे दोन वर्षे खंड पडला होता. कोल्हापुरात होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत उद्घाटन समारंभानंतर पहिल्या सत्रात १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वा. नागपूर प्रादेशिक विभागातील विजेता चंद्रपूर परिमंडळाचा संघ प्र.ल. मयेकर यांनी लिखित 'तो परत आलाय ' हे नाटक सादर करणार आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात दुपारी २.३० वाजता कोंकण प्रादेशिक विभागातून विजेता प्रकाशगड मुख्यालय संघ इरफान मुजावर यांनी लिखित 'सलवा जुडूम' हे नाटक सादर करणार आहे. दि.११ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वा. पहिल्या सत्रात औरंगाबाद प्रादेशिक विभागातील विजेता नांदेड परिमंडळाचा संघ अभिजित वाईकर यांनी लिखित 'नजरकैद ' हे नाटक सादर करणार आहे. त्याच दिवशी दुसऱ्या सत्रात दुपारी २.०० वाजता पुणे प्रादेशिक विभागातील विजेत्या परिमंडळाचा संघ नाटक सादर करेल.नाट्यस्पर्धेचा उद्घाटन समारंभ १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांच्या हस्ते होणार आहे. नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता  व्यवस्थापकी संचालक विजय सिंघल यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून अभिनेते ऋषिकेश जोशी उपस्थित असणार आहेत. याप्रसंगी संचालक प्रकल्प तथा मानव संसाधन संचालक प्रसाद रेशमे,   संचालक (वाणिज्य)मुरहरी केळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विशेष निमंत्रित म्हणून सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, मंगेश गोंदावले, अरविंद भादीकर, सुहास रंगारी, अंकुश नाळे, यांची उपस्थिती असणार आहे. या नाट्यस्पर्धेत सादर होणाऱ्या नाटकांसाठी नाट्यरसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. तरी नाट्यरसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परेश भागवत यांनी केले आहे.

                                                          ---