महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : उच्च शिक्षणाच्या कोल्हापूर विभागीय सहसंचालकपदी नागपूर येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.राजेसाहेब दास मारडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारडकर यांच्याकडे विभागीय सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविलेला आहे. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार सध्याचे विभागीय सहसंचालक डॉ. हेमंत कटरे यांच्याकडील कार्यभार मारडकर यांच्याकडे सोपविला आहे.
मारडकर हे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा आदेश काढला आहे. दरम्यान डॉ. कटरे हे राजाराम कॉलेज येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.