+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Dec 22 person by visibility 425 categoryआरोग्य
 मोरया हॉस्पिटल व स्वयंप्रभा मंचच्यावतीने व्याख्यान
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : योग्य आहार आणि वेळेवर खाणे झाल्यास आपल्या पोटाचे आरोग्य तंदुरुस्त राहील असे प्रतिपादन डॉ. संगीता निंबाळकर यांनी केले.
स्वयंप्रभा मंच व मोरया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. निंबाळकर म्हणाल्या,"  धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात खाण्याकडे वेळेवर लक्ष देत नाही. जर आपण योग्य आहार आणि वेळेवर खाल्ले तर आपण सर्वजण नक्की तंदुरुस्त राहू शकेन. वेळेवर न खाल्ल्याने शरीरातील पित्त वाढते आणि पित्त वाढले की इतर त्रास होऊ शकतो यासाठी वेळेवर योग्य आहार घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकेल.दर दोन तासांनी पोटामध्ये आहार आपण घेतला तर पोटाचे आरोग्य तंदुरुस्त राहील."
 स्वयंप्रभा मंचच्या संस्थापक अध्यक्ष सारिका बकरे यांनी मंचच्या उपक्रमांची माहिती दिली. मंचच्या कार्याध्यक्ष शुभदा हिरेमठ यांनी स्वागत केले. श्वेता पाटील यांनी आभार मानले.