महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा आरोग्य कर्मचारी अधिकारी यांची धन्वंतरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. गुणाजी नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.
धन्वंतरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये डॉ. नलावडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम. इंगवले यांनी काम पाहिले. चेअरमनपदी निवड झाल्यानंतर बोलताना नलावडे म्हणाले, " सर्वांना बरोबर घेऊन संस्थेच्या आणि सभासदांच्या हितासाठी काम करणार आहे." असे नमूद केले. याप्रसंगी संस्थेच्या माजी चेअरमन श्रीमती संगीता गुरव, व्हाईस चेअरमन संदीप नाईक, संचालक डॉ. प्रशांत कोरे, डॉ. मिलिंद कदम, महेश देशमुख, विनायक काटकर, विलास आळवेकर, श्रीमती पुष्पलता बर्गे , श्रीमती संध्या महाजन, तज्ञ संचालक संभाजी माने, डॉ.फारूक देसाई उपस्थित होते सुकाणू समिती सदस्य कुमार कांबळे , आर. एस. पाटील, शरद देसाई, श्रीकृष्ण बांदिवडीकर , सुनील पाटील , मंगल पाटील, विश्वनाथ परमने, डॉ. संदीप मिरजकर यांचे सहकार्य लाभले.
मावळत्या चेअरमन श्रीमती संगीता गुरव यांनी चेअरमन पदाच्या कालावधीमध्ये संस्थेच्या हितासाठी अनेक निर्णय सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटना,महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटना, स्वाभिमानी आरोग्य सेवक संघटना , विस्ताराधिकारी संघटनाचे प्रतिनिधी व संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुभाष इंदुलकर उपस्थित होते.