+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Jan 23 person by visibility 303 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या शाहू छत्रपती केएसए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळाने बीजीएम स्पोर्टस् संघावर ५ विरुद्ध १ गोलने दणदणीत विजय मिळविला. कोल्हापूर पोलीस संघाने झकास कामगिरी करताना सम्राटनगर स्पोर्टस् संघाचा ३-१ असा पराभव केला. कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनने स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दिलबहार आणि बीजीएम यांच्यातील सामन्यात पूर्वार्धात बीजीएमने चांगली लढत दिली. पण जादा वेळेत दिलबहारच्या स्वयंम साळोखेने ४२ व्या मिनिटाला गोल करत संघास आघाडीस नेले. हीच स्थिती मध्यंत्तरापर्यंत टिकली. उत्तरार्धात दिलबहारने वेगवान खेळ करत सलग तीन गोलची नोंद केली. ४७ व्या मिनिटाला राहूल तळेकरने, ५९ व्या मिनिटाला महमंद खुर्शीद तर ६५ व्या मिनिटाला स्वयंम साळोखेने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा गोल केला. बीजीएमच्या रोहन कांबळेने ६८ व्या मिनिटाला गोल करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. ७३ व्या मिनिटाला दिलबहारच्या इम्यॅन्युअलने गोल करत दिलबहारच्या मोठा विजयाची नोंद केली. दिलबहारने हा सामना ५-१ असा गोल फरकाने जिंकला.
 पहिल्या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाच्या अफताफ मुल्लाने १५ व्या मिनिटाला गोल करत सम्राटनगर संघावर दबाव वाढविला. मध्यंत्तरास कोल्हापूर पोलिस संघ १-० असा आघाडीवर होता. उत्तरार्धात सम्राटनगरच्या रोहन कांबळेने गोल करत सामना बरोबरीत आणत सामन्यात चुरस वाढवली. पण कोल्हापूर पोलिसांच्या प्रथमेश साळुंखेने ७१ व्या तर सुशाम पाटीलने ८३ व्या मिनिटाला गोल करत संघाला ३-१ असा विजय मिळवून दिला.