महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी खासदार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा स्वतःची तुलना शिवरायांसोबत करतानाच्या व्हिडिओबद्दल तीव्र आक्षेप घेत भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर महानगरतर्फे छत्रपती शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदविण्यात आला.
त्या व्हिडिओची तात्काळ प्रसिद्धी थांबून याबद्दल राहुल गांधींनी स्वतः जनतेची माफी मागणे अपेक्षित आहे. असे न केल्यास भाजप युवा मोर्चाकडून आंदोलन आणखी तीव्र करू. यावेळी कोल्हापूर युवा मोर्चाचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय खाडे पाटील, प्रदेश सदस्य विराज चिखलीकर,संघटन महासचिव विवेक वोरा, सरचिटणीस पारस पालीच्या, उपाध्यक्ष सुनील पाटील,अमेय भालकर,कार्तिक देशपांडे ,गौरव सातपुते,युवराज शिंदे, प्रसाद पाटोळे, रोहित कारंडे,ओमकार गोसावी, अनिकेत मुतगी,विश्वजीत पवार,प्रदीप घाडगे, हर्षवर्धन पाटील, निरंजन घाडगे,अमित शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.