+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Jan 23 person by visibility 410 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत 39 कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती दिलेले नाही. मात्र दलित वस्ती योजना अंतर्गत कामे लोकप्रतिनिधींना विचारात घेऊन करावेत. कामांची यादी लोकप्रतिनिधींना दाखवावी अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. त्यानुसार दोन-तीन दिवसात संबंधित कामांच्या याद्या खासदाराने आमदारांच्याकडे दिल्या जाणार आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली. 39 कोटी रुपयांची कामे 885 ठिकाणी होणार आहेत. हे कामे करत असताना ज्याच्या तालुक्यातील आमदार आणि लोकसभा मतदारसंघातील खासदार यांना विचारात घेऊन याद्या अंतिम कराव्यात असे पालकमंत्री आणि सुचवले आहे. दलित वस्ती योजनेअंतर्गत समाज मंदिराची दुरुस्ती, बालोद्यान ओपन जिम, ग्रंथालय वाचनालय आधी कामांना प्राधान्य देण्याची सूचना पालकमंत्री केसरकर यांनी केले आहे.
26 जानेवारी रोजी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री केसरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्यामध्ये चर्चा झाली‌. त्यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी दलित वस्ती योजना अंतर्गत होणाऱ्या कामासंबंधी सूचना केली. पालकमंत्री यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समाजकारण अधिकारी दीपक घाटे उपस्थित होते.