+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule31 Dec 22 person by visibility 584 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर ::शहिद फौजदार राजू जाधव यांच्या ३० व्या स्मृतीदिनानिमित्त  १४ ते १६ जानेवारी २०२३ या कालावधीत दाजीपूर पदभ्रमंतीचे आयोजन केले आहे. जंगलामध्ये फिरण्याची इच्छा अनेकांना असते. त्यापैकी बहुतेकांना
जंगलाबद्दल फारशी माहिती नसते. अर्थातच घनदाट जंगल म्हणजे काय याचा अनुभव घेणे अशक्यच! सदापणीं जंगले
( व्हर्जिन फॉरेस्ट ) भारतात फारच थोडी आहेत. दाजीपूर गवा अभयारण्य त्यापैकी एक! या अभयारण्यात पाटाचा डंक, मानबेट, पदमसत्ती हा भाग घनदाट झाडीचा आहे. आंबा, जांभूळ, कडीपत्ता, दालचिनी झाडे आहेत. सात वर्षातून एकदाच फुलणारी कारवी आहे. शेंदरी, पाथरी अशा अनेक खुरट्या वनस्पती आहेत. असंख्य पक्षी, कोल्हे, भेकरे, बिबळ्या, खवेले मांजर, सांबर आणि गवे अशा प्राण्यांनी समृध्द अशा जंगल आहे. शहिद फौजदार राजू जाधव मेमोरियल फौंडेशनमार्फत  १४ ते१६ जानेवारी २०२३ असे तीन दिवस दाजीपूर पदभ्रमंती आयोजित केले आहे.
पदभ्रमंतीची सुरवात शहिद फौजदार राजू जाधव मेमोरियल फौडेशन, कोल्हापूर प्लॉट नंबर १, शारदा हौसिंग सोसायटी, राजारामपुरी ८ वी गल्ली (आमदार पी. एन.पाटील यांचे बंगल्यासमोर ) येथील कार्यालयापासून सुरू होणार आहे.  पदभ्रमंती कार्यक्रमामध्ये विद्यार्थी विद्यार्थीनी पासून ते जेष्ठ नागरीकांपर्यंतच्या वयोमानामधील शारिरिकदृष्ट्या संपूर्ण फिट असे जास्तीत जास्त निसर्गप्रेमी पदभ्रमंती सदस्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मोहिमप्रमुख संजय एन. जाधव केले आहे.  नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी  मोबाइल नंबर ८८०५००४४६६ , ९८२२००७०५६ संपर्क साधावा.