+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Dec 22 person by visibility 323 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सुदर्शन नारायण सुतार यांना ‘शिक्षा गौरव पुरस्कार-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशनच्या वतीने गुरुवारी मुंबईत झालेल्या समारंभात प्रा. सुतार यांचा गौरव करण्यात आला. याच समारंभात ‘टीपीओ ऑफ द इअर’ म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला.
   ‘युनिव्हर्सल मेंटॉर असोसिएशन’च्यावतीने आयोजित चौथ्या ‘एज्युलीडर समीट’ मध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे हा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रा.सुदर्शन सुतार यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावर ‘शिक्षा गौरव पुरस्कार’ ने तर ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्याना उत्तम करिअर संधी मिळवून दिल्याबद्दल ‘टीपीओ ऑफ द इअर’ या दोन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ लीतेश मालदे यांनी  सुतार यांचे अभिनंदन केले.