+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule28 Sep 22 person by visibility 199 categoryराजकीय
१७ विद्यार्थ्यांना शांतादेवी डी. पाटील यांच्या नावांनी शिष्यवृत्ती, अभ्यासक्रमाचे १०० टक्के शुल्क माफ
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे विविध अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेतलेल्या १७ विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतदेवी डी पाटील मेरिट स्कॉलरशीप’ने सन्मानित करण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांचे १०० टक्के शुल्क माफ करण्यात येत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी केली.
विद्यापीठाच्या दुसऱ्या ओरिएंटेशन प्रोग्राममध्ये अध्यक्षस्थानांवरून ते बोलत होते. संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठाच्या नव्या शैक्षणिक इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या शांताई हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, डी. वय. पाटील अभिमत विद्यापीतठाचे कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, डीन राकेश शर्मा उपस्थित होते.
ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली. कुलगुरू डॉ. के प्रथापन यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचा व भविष्यातील योजनेचा आढावा मांडला.
“सकारात्मक विचार ठेऊन, योग्य ध्येय ठेऊन वाटचाल केल्यास निश्चितच यश मिळते’ असे प्रतिपादन डी. वाय पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी यावेळी केले. यावेळी संस्थेचे सचिव श्रीपाद धरणगुत्ती, सीएफओ श्रीधर स्वामी, सीएचारओ श्रीलेखा साटम, केतन जावडेकर उपस्थित होते. अंजली पाटील, प्रा. सुनंदा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जे. ए. खोत यांनी आभार मानले.
………………………
सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी
प्रत्येक अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक गुण मिळवून प्रवेश घेणाऱ्या १७ विद्यार्थ्याना ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट शिष्यवृत्ती’ प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये अवंतिका उल्हास कदम (बीबीए), शिवानी सुधीर हुपरीकर (एमबीए), प्रणाली सर्जेराव वावरे (एमबीए-एबीएम), सरोश दाबीर पठाण (बी.टेक फूड टेक्नॉलॉजी), सचिन पतंग शिंदे (एम.टेक.फूड टेक्नॉलॉजी), शुभम चंद्रकांत इंगळे (एमएस्सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी), रोहन संपत खोत (एमएस्सी अनलेटिकल केमिस्ट्री),ऋतुजा चंद्रकांत घोरपडे (एमएस्सी ऑर्गनिक केमिस्ट्री), सूरज सुखदेव माने (बी. टेक कॉम्प्युटर सायन्स), दिशा सचिन पाटील (बी. टेक कॉम्प्युट सायन्स एआय अँड एमएल), श्वेता धनाजी भोसले (बी. टेक. कॉम्प्युटर सायन्स -डेटा सायन्स), वरद सचिन बागल (एम. टेक कॉम्प्युटर सायन्स एआय अँड एमएल), सानिका रणजित पाटील (बीसीए), स्नेहा अरविंद जाधव (एमसीए), अथर्व अभय पाटील (बी.टेक अग्रीकल्चरल इंजिनिअरिंग), शोएब जहागीर पटेल (एम.टेक अग्रीकल्चरल इंजिनिअरिंग), वसिफा आगलावे (पी.एचडी.) यांचा समावेश आहे.