क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी होणार-विवेकानंदतर्फे आयोजित चर्चासत्रात उमटला सूर
schedule01 Nov 25 person by visibility 44 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डिजिटल विश्वातील पारदर्शकता, सुरक्षितता याविषयीच्या संकल्पना ब्लॉकचेन आणि क्रिप्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे बदलल्या जाणार असून हे तंत्रज्ञान भविष्यात सर्वव्यापी होणार आहे. ' डिजिटल ट्रस्ट ' आणि ' इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट ' यांचा पाया नवतंत्रज्ञानामुळे भक्कम होणार आहे. डाटा अनालिटिक्स, ऑनलाइन सर्व्हिसेस आणि क्लाऊड प्लॅटफॉर्म्स यांना डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्समुळे नवा आधार मिळाला आहे. असा सूर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तज्ञांच्या चर्चासत्रामध्ये उमटला
. इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (पुणे सेक्शन, मुंबई सेक्शन) ,कॉम्प्युटर सोसायटी ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ' इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन ब्लॉकचेन डिस्ट्रीब्यूटेड सिस्टिम्स ॲन्ड सिक्युरिटी ' या तीन दिवसीय परिषदेचा रविवारी झाली. आयईईई कॉम्प्युटर सोसायटी पुणे चॅप्टरचे चेअरमन डॉ. राजेश इंगळे, कर्टीन विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया) येथे कार्यरत संशोधक डॉ. विद्यासागर पोतदार, इलिऑट सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीटीओ अँड हेड ऑफ इंडिया ऑपरेशन्स डॉ. गिरीश खिलारी आणि डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांनी चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.
परिषदेसाठी देश विदेशातून आलेल्या संशोधकांना महाराष्ट्र आणि विशेषतः कोल्हापूरचे सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या ' महाराष्ट्र दर्शन ' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले. पोवाडा, कोळीनृत्य, शेतकरी नृत्य, शिवराज्याभिषेक सोहळा वगैरे अस्सल मराठमोळ्या कलांचे प्रभावी सादरीकरण स्थानिक कलाकारांनी करून उपस्थियांची मने जिंकली. परिषदेच्या यशस्वी संचालनासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, गौरव गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या व्यावसायिक शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी यांनी तीन दिवसीय परिषदेसाठी सर्व सुविधा व मनुष्यबळ यांचे उत्तम नियोजन करून संचालन केले. पत्रकार चारुदत्त जोशी यांनी सहसंवादकाची भूमिका घेतली.