नगरपालिका-नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरला
schedule02 Dec 25 person by visibility 179 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकींचा निकाल २१ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने हा आदेश काढला. नगरपंचायत व नगपालिका निवडणुकीसाठी वीस डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आहे. राज्यातील २० नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक वाद ,कायदेशीर प्रक्रिया यामुळे पुढे ढकलल्या आहेत.तर राज्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होत आहे आणि तीन डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर केली होती. दरम्यान मतमोजणी पुढे ढकलली आहे. राज्यात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकींचा कार्यक्रम सुरू आहे. दरम्यान वीस नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, यवतमाळ, धाराशिव, नांदेड, अहिल्यानगर, चंद्रपूर, ठाणे, जिल्ह्यातील नगरपालिकांचा समावेश आहे. या ठिकाणी २० डिसेंबरला मतदान आहे. यामुळे दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची मतमोजणी पुढे ढकलली आहे. दोन डिसेंबर व २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाची एकत्रित मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे.