महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :- महापालिकेतील शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर नॅशनल एक्सलन्स ॲवॉर्ड २०२२ जाहिर झाला होता. नॅशनल युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ.आदित्य सिंघानिया व न्यू दिल्ली आदिलीला फौंडेशनचे प्रतिनिधी डॉ.राम प्रभावळे यांनी गुरुवारी हा ॲवॉर्ड, मेडल, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन आयुक्त कार्यालयात त्यांचा सत्कार केला. प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार त्यांनी स्विकारला. यावेळी जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, प्रकल्प अधिकारी अरुणकुमार गवळी व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.
शहर अभियंता सरनोबत हे महापालिकेत ३१ वर्षे सेवा बजावत आहेत. कोरोना काळात तसेच २०१९-२०२१ मधील महापुराच्या आपत्तीत त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली होती. याची दखल घेऊन संस्थेने पुरस्कार देत सन्मान केला.