+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule24 Dec 22 person by visibility 321 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
 'डीवायपी सिटी मॉल' मध्ये 'ख्रिसमस' व 'न्यू इयर' सेलिब्रेशन सुरू झाले आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, रॉक बँडची साथ, विविध आऊटलेटवर डिस्काउंट ऑफर आणि रविवारी ( २५ डिसेंबर) ख्रिसमससाठी सांताक्लॉजकडून भेटवस्तू मिळवण्याची व धम्माल मस्तीची संधी यानिमित्ताने मिळणार आहे.  ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी 'डीवायपी सीटी' मध्ये २५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे सेलिब्रेशन होणार आहे. लहान मुलांना फोटो भूत, रॉक बँडच्या तालावर रविवारी 'ख्रिसमस सेलिब्रेशन'चा आनंद लुटता येईल. सांताक्लॉजकडून यावेळी मुलांना खाऊ व भेटवस्तूही मिळणार आहेत. 31 डिसेंबर रोजीही रॉक बँडच्या साथीने याठिकाणी नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.
 सेलिब्रेशन निमित्त ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये फूड कोर्टमध्ये दहा टक्के सूट मिळणार आहे. तसेच शॉपर्स स्टॉप'सह अन्य आऊटलेटवर २६ जानेवारीपर्यंत ५०  टक्केपर्यंतची सूट मिळणार आहे. 
सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यत मॉलची सेवा सुरु असेल.