+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!!
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Sep 22 person by visibility 708 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
निवृत्त शिक्षकाकडे भविष्य निर्वाह निधीतील रक्कम परत करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक उत्तम बळवंत कांबळे (वय 46 वर्ष) याच्या विरोधात लाच प्रतिबंधक विभागाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
 पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली. तक्रारदार हे सहाय्यक शिक्षक असून ते 31 मे 2022 रोजी निवृत्त झाले. त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधी रक्कम मिळण्यासाठी किणी हायस्कूल येथे अर्ज दिला. शाळेने हा अर्ज शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवला. सोमवार पेठ, हत्ती महाल रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात तक्रारदार सहाय्यक शिक्षकांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. या कार्यातील वरिष्ठ लिपिक उत्तम कांबळे यांनी भविष्य निर्वाह निधी रक्कम परत मिळवण्यासाठी आणि साहेबांची सही घेण्यासाठी 22 ऑगस्ट रोजी 25 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 23 आॅगस्ट रोजी हत्ती महाल रोडवरील शिक्षण उपसंचालक कार्यालयात सरकारी पंचांच्या उपस्थितीत लाचेची पडताळणी करण्यात आली. भविष्य निर्वाह निधीतील रक्कमचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आणि साहेबांची सही घेण्यासाठी 25 हजार रुपयेची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी उत्तम कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन कुंभार,पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बंबरगेकर, शरद पोरे, सुनील घोसाळकर, रुपेश माने, यांनी या कारवाईत भाग घेतला.