+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत
Screenshot_20240226_195247~2
schedule11 Jan 23 person by visibility 291 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
अठरा वर्षाखालील विद्यार्थी दशेतील मुलांना वाहन चालवण्यास देणाऱ्या ११० पालकांच्या विरोधात शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कोर्टात खटले दाखल केले आहेत. 
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह सुरू झालेला आहे. वाहन चालकांचे समुपदेशन, प्रबोधन त्याचबरोबर कारवाईही केली जात आहे. कोल्हापूर शहरात 18 वर्षाखालील विद्यार्थी शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लास मध्ये वाहने घेऊन जात असल्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच त्यांच्या अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. अठरा वर्षाखाली मुलांना जीव ही गमावावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी शहर वाहतूक नियंत्रक शाखेच्या कार्यालयाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी संपूर्ण शहरात वाहने चालणारे 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या कारवाई करण्यात आली. त्यांची वाहने शहर वाहतूक शाखेत आणून कारवाई केली. या कारवाईमुळे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती कारवाई टाळण्यासाठी विद्यार्थिनी नेते मंडळींशी संपर्क साधत होते. पण पोलीस कारवाईवर ठाम होते. वाहन चालवणाऱ्या अल्पवयीन मुले आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनाही शहर वाहतूक शाखेच्या कार्यास बोलवण्यात आले. पोलिसांनी त्यांना समुपदेशनही केले. तसेच 110 पालकांच्या विरोधात लहान मुलांना वाहन चालवण्यास दिल्याबद्दल कोर्टात खटले दाखल करण्यात आले आहेत, असे पत्रक शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी आणि प्रसिद्धीस दिले आहे.