+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Jan 23 person by visibility 203 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
राष्ट्रीय मुल्यमापन समितीकडून (नॅशनल बोर्ड ऑफ अॅकिडीटेशन, नवी दिल्ली) भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर या महाविद्यालयास सलग तिस-यांदा एनबीएचे पुर्नमानांकन मिळाले आहे. समितीने  १५ ऑक्टोंबर २०२२ रोजी महाविद्यालयास भेट दिली होती. या समितीमध्ये प्रा. डॉ. बी. पी. श्रीनिवासन (दिल्ली) यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले‌ डॉ. किशन वारंगळ सदस्य होते.
 समितीकडुन आऊटकम बेस्ड एज्युकेशन (ओबीई ) या  तत्वावर  विद्यार्थ्याचा होणारा सर्वागीण विकास, महाविद्यालयातील उच्च शिक्षण व संशोधन विषयक कामकाज, महाविद्यालयाची इमारत, प्रयोगशाळा, संगणकविभाग, इंटरनेट, ग्रंथालयातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिके, ऑनलाईन नियतकालिके यांचे सुक्ष्म मुल्यमापन करण्यात आले. तसेच महाविद्यालयास मिळालेले चाळीस पेटंटस, १००० हून अधिक प्रकाशित संशोधन पेपर्स महाविद्यालयातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरहसादर शोधनिबंध, महाविद्यालयातील शिक्षकांची दहा प्रकाशीत पुस्तके याची समितीकडून विशेष दखल घेण्यात आली.
 शिवाजी विद्यापीठ फार्मसी कार्य क्षेत्रात एन.बी.ए चे तिस-यांदा पुर्नमानांकन मिळालेले भारती विद्यापीठ
कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर हे एकमेव फार्मसी महाविद्यालय आहे. 
 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे, एन. बी.ए समन्वयक व उपप्राचार्यडॉ. एम. एस. भाटीया, उपप्राचार्य डॉ. एन. आर जाधव शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, मानंद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी अभिनंदन केले.