+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 275 categoryक्रीडा
केएसए फुटबॉल स्पर्धा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
तब्बल दोन गोलची पिछाडी भरून काढत बालगोपाल तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबवर तीन विरुद्ध दोन गोलने थरारक विजयाची नोंद केली. कोल्हापूर स्पोर्ट्स आयोजित श्रीमंत शाहू छत्रपती के एस ए वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धा शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर खेळवली जात आहे.
प्रॅक्टिस फुटबॉल क्लब आणि बालगोपाल तालीम मंडळ यांच्यातील सामना अतिशय चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला सामन्याच्या विसाव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या ज्युलियस स्ट्रो याने बालगोपालचा बचाव भेदत संघाचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर अवघ्या सातच मिनिटात 27 व्या मिनिटाला सागर चिलेने प्रॅक्टिस संघाचा दुसरा गोल केला. ही स्थिती मध्यंतरापर्यंत कायम राहिली.
उत्तरार्धात दोन गोलचे ओझे घेऊन बालगोपालचा संघ मैदानात उतरला. ४२ व्या मिनिटाला अभिनव साळोखेने मैदानी गोल करत बालगोपालची आघाडी एकने कमी केली. परतफेडीच्या गोलमुळे बालगोपाल संघ आक्रमक झाला. ६१ व्या मिनिटाला सुरज जाधवने मैदानी गोल करत सामना दोन-दोन असा बरोबरीत आणला.
सलग दोन गोल मारल्याने बालगोपालने प्रॅक्टिस वर दबाव वाढवला. त्याचा फायदा घेत ६४ मिनिटाला अभिनव साळोखेने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. बरोबरी साधण्यासाठी प्रॅक्टिसने चढायांचा वेग वाढवला पण बालगोपालच्या मधल्या आणि बचाव फळीने भक्कम बचाव करत गोल होऊन दिला नाही. पूर्ण वेळेत ३-२ अशी आघाडी टिकवत बालगोपालने सामना जिंकला आणि तीन गुण वसूल केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाला मैदान हवे असल्याने शुक्रवार २० ते २७ जानेवारीपर्यंत साखळी स्पर्धेचे सामने स्थगित करण्यात आले आहेत.