+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Jan 23 person by visibility 420 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा मूलमंत्र शिवसेनाप्रमुखांनी शिवसैनिकांना दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेला समाजकार्याचा वसा कायमपणे जपला जाईल. आगामी काळात नव्याने निर्माण होणाऱ्या आणि पुनर्बांधणी होणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या शाखा समाजकार्याचा केंद्रबिंदू ठरतील, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.       बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन क्षीरसागर यांच्या हस्ते भुयेवाडी येथे करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश करीत आगामी काळात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची ताकद वाढविण्याचा आणि समाजकार्याचा निर्धार केला.  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर कृष्णात पवार यांनी शेकडो कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिकांसह राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव पाटील, उदय भोसले, तुकाराम साळोखे, शहर प्रमुख रणजीत जाधव, उपशहरप्रमुख अंकुश निपाणीकर, कृष्णात आनंदा पोवार, दिलीप चव्हाण
अनंत पोवार, शांताराम घोरपडे, कृष्णात पाटील, केरबा तावडे, प्रकाश खोचिकर, रवि खोचिकर, महेश पाटील, सुशांत पाटील, बबन कोपार्डे, बाबासो पोवार, अजित पाटील, कृष्णात गराडे उपस्थित होते.