+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश adjustस्वीडनमध्ये मराठी कुटुंबातर्फे गुढीपाडव्याचे स्वागत adjustशाहूंचे शक्‍तीप्रदर्शन ! जनसागराच्या साक्षीने विजयाचा निर्धार पक्‍का!! adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Jan 23 person by visibility 1127 categoryजिल्हा परिषद
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेती विषयक तंत्रज्ञान नवीन प्रयोग व उत्पादनाची एका छताखाली माहिती मिळावी म्हणून आयोजित भीमा कृषी प्रदर्शन यंदा 26 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत होत आहे यंदाच्या कृषी प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हरियाणा येथील बारा कोटी किंमत असणारा जगातील सर्वात उंच बादशाह रेडा आणि प्रतिलिटर ३१ लिटर दूध देणारी बिजली म्हैस होय. कसबा बावडा रोड वरील मेरी वेदर मैदान येथे हे प्रदर्शन होणार आहे.
 खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून गेली पंधरा वर्षे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या कृषी प्रदर्शनात शेती अवजारे बी बियाणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा समावेश असणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल या प्रदर्शनात शेतीतील प्रयोग पशुपालन कृषी उत्पादने खाद्यपदार्थांचे स्टॉल असणार आहेत. याशिवाय तांदूळ महोत्सव हे वेगळे आकर्षण ठरणार आहे.
 या प्रदर्शनात 250 अधिक जनावरे, वेगवेगळ्या जातीच्या म्हशी, रेडे, गायी, बैल, शेळ्या, परदेशी पक्षी, कोंबड्या असणार आहे. शेती क्षेत्राशी निगडित नवीन बदल शेतकऱ्यांना करावेत या अनुषंगाने प्रदर्शन कालावधीत रोज शेतीशास्त्रज्ञाने शेतकरी संवाद असा कार्यक्रम होणार आहे.