+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला adjustही निवडणूक देशाच्या विकासाची, म्हणून मत मोदींना-हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule21 May 23 person by visibility 174 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
“गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी राबवलेले समाजोपयोगी उपक्रम घराघरात पोहचवणं ही बूथप्रमुखांची जबाबदारी आहे” अशी सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिली. 
भारतीय जनता पक्षाची जिल्हा कार्यकारिणीची बैठक शाहू स्मारक भवनमध्ये झाली. या बैठकीला राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक, विजय जाधव, डॉ. संजय पाटील, अशोक देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामीण सरचिटणीस सुनील मगदूम, महेश जाधव, राहुल चिकोडे यांनी मोदी सरकारच्या कामकाजाची माहिती दिली. शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या १० महिन्यात समाजातील प्रत्येक घटकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत असे त्यांनी सांगितले. मंत्रीज्ञखाडे यांच्या हस्ते माजी आमदार अमल महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. सध्याच्या काळात कोणत्याही निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत. बूथ यंत्रणा सक्षम झाली, तर निवडणूक जिंकता येते. २०१९ च्या निवडणुकीत आपण केवळ बूथ यंत्रणेमुळे ३७ हजार मतांनी निवडून आलो, असे  खाडे यांनी सांगितले.