+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...!
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 23 person by visibility 366 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  सातत्याने अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या दैनंदिन अडचणीचे कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाबद्दल चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रशासनाने असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी 'जोवर प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर इथून जाणार नाही'अशी भूमिका घेऊन दोन तास ठिय्या मारला. "सर्व प्रश्नांची लेखी उत्तरे देऊ आणि लवकरात लवकर पाणी प्रश्नांची श्वेतपत्रिका काढून शहराची पाणी परिषद भरवू" अशी ग्वाही प्रशासकांनी दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आयुक्त कार्यालय सोडले.
 कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच पंपिंग स्टेशन मधील पंपांची व अन्य साधनांची परिस्थिती विदारक झालेली आहे. भाजपा पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी शिंगणापूर पंपिंग स्टेशनला भेट दिली असता ही परिस्थिती दिसल्यामुळे त्यांनी आज आयुक्तांबरोबर बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार माजी महापौर सुनील कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्रिणी यांच्यासह शिष्यमंडळ प्रशासक कार्यालयात बैठकीसाठी आले. सुरुवातीला शिंगणापूरचे तीन पंप दुरुस्त करण्याचा डिसेंबर २०२१ मध्ये दिलेल्या प्रस्तावाची फाईल पहावयास द्या अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. यावर अधिकारी कोणतेही संयुक्तिक उत्तर देईनात आणि फाईल दाखवण्यास टाळाटाळ केली. याप्रश्नी कार्यकर्त्यांनी जोपर्यंत फाईल दाखवत नाही तोवर इथून जाणार नाही, फाईल नाही असे सांगा आम्ही पोलीसात करू असे प्रशासनाला ठणकावले. 
 यावेळी पाणीपुरवठा विभागाकडे मंजूर पदे, रिक्त पदे, एकूण उपसा होणारे पाणी व बिलिंग होणारे पाणी, काही वर्षांपूर्वी एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दृष्टोत्पत्तीस आलेल्या मोठ्या गळत्या आणि ए बी वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचा भ्रष्टाचार, धोत्री गल्ली येथे दोन वर्षे येणारे मैला व आळ्या मिश्रित पाणी इत्यादी मुद्दे अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, संदीप कुंभार, प्रकाश घाटगे, विजय आगरवाल यांनी मांडले. तसेच संजय सावंत, प्रदीप उलपे चंद्रकांत घाडगे मंगल निपाणीकर यांनी जल अभियंता व प्रभारी सहाय्यक अभियंता यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. 
यावेळी उपाध्यक्ष राजू मोरे, सचिन तोडकर, डॉ.सदानंद राजवर्धन, आशिष कपडेकर, प्रीतम यादव, सचिन सुतार, प्रवीणचंद्र शिंदे, महेश यादव, सुजाता पाटील, सिद्धेश्वर पिसे, ओंकार गोसावी, ओंकार खराडे उपस्थित होते.