+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustस्वाभिमानीचे शक्तीप्रदर्शन, शेट्टींनी बैलगाडीतून जाऊन अर्ज भरला adjustमुख्यमंत्र्यांनी घेतली महाडिकांची भेट, शिरोलीत दोन तास खलबतं ! adjustडीवाय पाटील इंजिनीअरिंगमध्ये टेक्निकल इव्हेंट उत्साहात adjust१०५ माजी नगरसेवकांचा संजय मंडलिकांना पाठिंबा adjustशाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार, महाविकास आघाडीकडून मोठे शक्तिप्रदर्शन ! adjustमहायुतीचे शक्ती प्रदर्शन ! मंडलिक, मानेंचा उमेदवारी अर्ज दाखल !! adjustप्रकाश आवाडेंची माघार, धैर्यशील मानेंना पाठिंबा ! adjust हातकणंगलेसाठी रात्रीस राजकारण चाले ! मुख्यमंत्र्यांनी घेतली कोरे, यड्रावकरांची भेट !! adjustसर्व्हेवर राजकारण चालत नाही, जनता सर्वेसर्वा- खासदार मानेंचा आवाडेंना टोला adjustही निवडणूक देशाच्या विकासाची, म्हणून मत मोदींना-हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule26 May 23 person by visibility 298 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि पाच विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविलेल्या डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या 'विद्येच्या प्रांगणात' या आत्मकथनाचे प्रकाशन समारंभ शुक्रवारी (२६ मे २०२३) होत आहे.दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५.३० वाजता हा समारंभ होत आहे.
 श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रमुख वक्ते आहेत. साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठासह (राज्य अकृषी विद्यापीठ) राजस्थान केंद्रीय विद्यापीठ, जयपूर (केंद्रीय), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक (मुक्तशिक्षण), सिम्बायोसिस, इंदौर (कौशल्य विकास) आणि भारती विद्यापीठ, पुणे (अभिमत) अशा देशातील एकूण पाच विविध प्रकारच्या विद्यापीठांचे कुलगुरुपद भूषविले आहे. या आत्मकथनाच्या माध्यमातून त्यांचा जीवनप्रवास उलडणार आहे. कुलगुरू डी. टी. शिर्के, आमदार सतेज पाटील, डॉ. रणधीर शिंदे आणि अरविंद पाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.