+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule29 Sep 22 person by visibility 557 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्ट्‌स्‌ असोसिएशनच्या ८२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पातळीवर यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.  संस्थेचे उपाध्यक्ष व्यंकटेश घाटगे हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे पेट्रन-इन्‌चीफ्‌ श्रीमंत शाहू छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती होती.
  शाहू महाराज यांच्या हस्ते मधुरिमाराजे यांची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्यपदी सलग दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.  सभेचे अध्यक्ष घाटगे व मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर व खेळाडू यांना ट्रॉफी देऊन सत्कार केले. 
जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी प्रास्ताविक केले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पोलंड देशाच्या वतीने मानाचा "द बेने मेरिटो' पुरस्काराने मिळाल्याबद्दल, मालोजीराजे यांची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समितीवर सदस्यपदी आणि फायनान्स कमिटीचे उपाध्यक्षपदी निवड, कॉम्पिटीशन कमिटीचे सदस्यपदी व १७ वर्षाखालील मुली भारतामध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झालेबद्दल मधुरिमाराजे यांची अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन, महिला समिती सदस्यपदी सलग निवडबद्दल  अभिनंदन करण्यात आले.
 विरेन अभिजीत पाटील याची अमन, जॉर्डन येथील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड व ११ वर्षाखालील गटात कास्यपदक मिळाल्याबद्दल. ऐश्वर्या जाधव हिची आय.टी.एफ.वल्र्ड ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिप आणि विम्बल्डन स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल, वैष्णवी सुतार यांची कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय पॅरा टेबल टेनिस खेळाडू यांचा उत्कृष्ट दिव्यांग खेळाडू म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान झालेबद्दल, नाशिक येथील विजेता 17 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल संघाचे व पालघर येथील उपविजेता महिला फुटबॉल संघाची निवड झाल्याबद्दल के.एस.ए. अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून व्यंकटेश घाटगे, अरूण नरके, व मानसिंग जाधव यांची निवड करण्यात  आली. संस्थेचे ऑडिटर म्हणून अमोल पवार यांची नेमणूक झाली.