कलाकारांनी कोल्हापूर स्कूलची परंपरा जपावी : इंद्रजित सावंत
schedule15 Mar 24 person by visibility 296 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राजर्षी शाहूंनी कलाकारांना राजाश्रय दिला . त्यामुळे कोल्हापूरात कलावंतांची पिढी तयार झाली . ही कोल्हापूर स्कूलची परंपरा जपली पाहिजे असे मत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले .
रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त ‘गुरु शिष्य’ उपक्रमांतर्गत कलाप्रदर्शनाचा प्रारंभी ते बोलत होते . शाहू स्मारक भवन येथे झालेल्या या सोहळ्यात के. आर. कुंभार उपक्रमशील युवा कलाकार पुरस्कार शिल्पकार ओंकार कोळेकर यांना प्रदान करण्यात आला.
दरम्यान या प्रदर्शनाचे उदघाटन विजयमाला मेस्त्री-पेंटर यांच्या हस्ते झाले. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या सचिव प्रा. अर्चना आंबिलधोक , उदय कुंभार, विलास बकरे , शिवाजी मस्के , देविका पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत विजय टिपुगडे प्रास्ताविक प्राचार्य अजय दळवी यांनी केले . आभार मनोज दरेकर यांनी मानले .
प्रदर्शनामध्ये विजय टिपुगडे, विलास बकरे, शिवाजी मस्के, मनोज दरेकर,संतोष पोवार, नागेश हंकारे, बबन माने, अभिजीत कांबळे, प्रविण वाघमारे, गजेंद्र वाघमारे, शैलेश राऊत, किशोर राठोड,राहूल रेपे, विजय उपाध्ये, अरिफ तांबोळी, प्रकाश मोहिते, नवज्योत काळे, सर्वेश देवरूखकर, पुष्कराज मेस्त्री, शुभम कुंभार, ओंकार कोळेकर, इंद्रजित बंदसोडे, पुनम राऊत, सुदर्शन वंडकर यांच्या कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन २१ मार्च पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८ ३० पर्यंत सवार्साठी विनामूल्य खुले राहणार आहे.