+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustडीवाय पाटील फार्मसीतर्फे रविवारी मेगा पूल कॅम्पस ड्राईव्ह adjustछत्रपतींच्या सुनेच्या मोटारीचे कुपेकरांच्या कन्येने केले सारथ्य adjustकोल्हापूरसाठी २३ ! हातकणंगलेसाठी २७ उमेदवार लढणार !!
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Aug 22 person by visibility 276 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे कार्यक्रम झाला. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
 अधिकारी व कर्मचारी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर समूह गीते व नृत्याचे सादरीकरण केले. जवळपास दोन तासाहून अधिक वेळ हा कार्यक्रम रंगला. ‘ऐ वतन वतन मेरे आबाद रहै तू’ या गीतांनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. सहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी जहाँ डाल डाल पर रहती है सोने की चिडिया हे गाणे सादर केले. उपस्थितांनी टाळयांच्या गजरात त्याला दाद दिली. मुख्य लेखापाल संजय सरनाईक, सहाय्यक अभियंता सतिश फप्पे परवाणा अधिक्षक राम काटकर, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले यांनी एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर करत कार्यक्रमात रंग भरला.
महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनीही देशभक्तीपर गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. विजय वणकुद्रे व पंडीत कंदले यांनी सूत्रसंचालन केले. सुतार बंधु झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा यांनी या कार्याक्रमाला संगीत दिले.
अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, सहाययक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, शहर भियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटणे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, नारायण भोसले, बाबूराव दबडे, लेखापरिक्षक प्रशांत पंडत, नगरससिव सुनिल बिद्रे, संजय भोसले, करनिर्धारक व संग्रहक सुधाकर चल्लावाड उपस्थित होते.