+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule01 Oct 22 person by visibility 473 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेना शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा व शहर युवासेना जोमाने कार्यरत असून प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये युवा संपर्क अधिकारी पदावर प्रसाद सुजित चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी पदावर अॅड. चेतन सुदर्शन शिंदे, महानगर युवा अधिकारी पदावर अक्षय आनंदराव कुंभार, जिल्हा युवा समन्वयक पदावर अविनाश प्रकाश कामते, जिल्हा युवा सरचिटणीस पदावर कुणाल संभाजी शिंदे, शहर युवा अधिकारी पदावर पियुष मोहन चव्हाण आणि विश्वदीप संजय साळोखे, शहर युवा सरचिटणीस पदावर अजिंक्य भास्कर पाटील, सुनील प्रभाकर शिंदे, अभिजित कदम, शहर युवा समन्वयक पदावर शैलेश शरदराव साळोखे आणि आय.टी.सेलच्या शहर अधिकारी पदावर सौरभ शिवदत्त कुलकर्णी यांची नियुक्ती झाली.
 नवनियुक्त युवा सेना पदाधिकाऱ्यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भगवी शाल देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, रमेश खाडे, किशोर घाटगे, तुकाराम साळोखे, शहर समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी शहर समन्वयक मंगल साळोखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, मंगलताई कुलकर्णी, फेरीवाले शहरप्रमुख अर्जुन आंबी उपस्थित होते.