+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustनॉट रिचेबल खासदारांना निवडणुकीतून हद्दपार करा-वसंतराव पाटील adjustरविवारपासून शहरात महायुतीच्या प्रचाराची रणधुमाळी - राजेश क्षीरसागर adjustडोंगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळा adjustकोल्हापुरात महायुतीच्या प्रचाराला मिसळ पे चर्चेचा तडका adjustवाळवा-शिराळा तालुक्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Jan 23 person by visibility 977 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर: 
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८ (२) फ यानुसार विद्यापीठाच्या सेवेतील अध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मधून एकाची सिनेट वरती नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ दिगंबर शिर्के यांनी नुकतेच धैर्यशील यादव यांना अधिसभा सदस्य नियुक्तीचे पत्र दिले. 
धैर्यशील यादव सध्या वित्त व लेखा विभागात कार्यरत आहेत. विद्यापीठाच्या अतिथी गृहाचा अधिकचा कार्यभार सांभाळत आहेत. नुकताच विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्षाचा विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी अवार्ड देऊन त्यांना विद्यापीठाने सन्मानित केले आहे. 
विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. विद्यापीठ क्षेत्रामध्ये काम करताना पर्यावरणपूरक कामकाजाच्या दृष्टीने सिल बंद पाण्याच्या प्लास्टिक बॉटल बंद करून स्टील तांब्या भांडे वापरणे, विद्यापीठाची विद्यापीठांतर्गत तसेच महाविद्यालयांतर्गत परिपत्रके ईमेल द्वारे पाठवण्यासाठी पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.शिवाजी विद्यापीठाच्या सेवक संघावर त्यांनी कित्येक वर्ष कार्यकारणी सदस्य व सल्लागार सदस्य म्हणून काम पाहिले आहे. कोल्हापूरचे दुसरे महापौर नानासाहेब यादव व कोल्हापूरचे काँग्रेसचे पहिले आमदार लालासाहेब यादव हे त्यांचे काका होत.