+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ?
Screenshot_20240226_195247~2
schedule23 Jan 23 person by visibility 345 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्षपदी अनिल ईश्वरा चव्हाण (कोरगावकर हायस्कूल) यांची तर उपाध्यक्षपदी शरद तावदारे (हेरवाड हायस्कूल) यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एम. ए. ओतारी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
 शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष चव्हाण व उपाध्यक्ष तावदारे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान नूतन पदाधिकारी निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक झाली. कोजिमाशिचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी निवड प्रक्रियेचे वाचन केले. यावेळी माजी चेअरमन डॉ. दत्तात्रय घुगरे, पांडुरंग हळदकर, बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, श्रीकांत पाटील, मदन निकम, सुभाष खामकर, अविनाश चौगुले, दीपक पाटील, राजेंद्र पाटील, श्रीकांत कदम, जितेंद्र म्हैशाळे, उत्तम पाटील, प्रकाश कोकाटे, मनोहर पाटील, सचिन शिंदे, राजाराम शिंदे,  ऋतुजा पाटील, शितल हिरेमठ यांच्या उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. यावेळी कोजिमाशिचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे, प्रशासन अधिकारी उत्तम कवडे, संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते.