+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule04 Jan 23 person by visibility 728 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या समवेत छत्रपती शाहू विद्यालयाचे माजी विद्यार्थी टाॅक शोद्वारे संवाद साधणार आहेत. न्यू पॅलेस परिसरातील शाहू विद्यालयाच्या प्रांगणात शुक्रवारी सहा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन शाहू विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी केले आहे, अशी माहिती आयोजक उद्योगपती अभिषेक मोहिते आणि संचित गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शाहू विद्यालयाच्या 350 हून अधिक विद्यार्थी टॉक शोमध्ये सहभागी होणार आहेत. तसेच कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागातील शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांनांही निमंत्रण देण्यात आले आहे. अंदाजे 1200 हून अधिक आजी माजी विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात आजी-माजी विद्यार्थ्यांना शाहू महाराजांच्या समवेत मनमोकळेपणाने मुक्त संवाद साधता येणार आहे. विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, उद्योग व्यवसाय, क्रीडा, शेती यामध्ये कार्यरत आहेत.अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी उच्च पदावर काम करत आहेत. 350 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची नोंद केली आहे. तसेच सध्या उच्चस्पद अधिकार पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी व्हिडिओद्वारे महाराजांना शुभेच्छा दिल्या आहेत.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शनिवारी 7 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता न्यू पॅलेस ते शाहू विद्यालय पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या वाढदिवसानिमित्त एक्सलन्स अवॉर्ड आणि स्कॉलरशिपसाठी 75 हजार रुपयांची रक्कम महाराजांच्या हस्ते देण्यात येणार आहे. महाराजांच्या वाढदिवसानिमित्त माजी विद्यार्थ्यांच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमात उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
 पत्रकार परिषदेला युवराज मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे, आशपाक आजरेकर, शिवतेज खराडे, माजी नगरसेवक अर्जुन माने, अपूर्वा जाधव मोहिते जाहिरा काझी खान, पल्लवी सरपोतदार देशपांडे, प्रार्थना ओसवाल ,यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.