महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापू : कोल्हापूर येथील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट देण्यात येणारा "नीतीप्रज्ञ न्यायरक्षक" पुरस्कार – २०२२ यंदा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस यांना जाहीर करण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख पाच हजार रुपये व दहा हजार रुपयांची पुस्तके असे पुरस्काराचे स्वरुप आहे. अशी माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी दिली.
पुरस्कार समारंभ शुक्रवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता दसरा चौक येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. महादेवराव आडगुळे आणि लातूरचे ॲड. मंचकराव डोणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण आहे. ॲड. विवेकानंद घाटगे, ॲड. गिरीश खडके, अनिल म्हमाने उपस्थित राहणार आहेत. ॲड. प्रकाश मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होत आहे.
पत्रकार परिषदेस डॉ. दयानंद ठाणेकर, प्रा. डॉ. शोभा चाळके, अमित मेधावी, विमल पोखर्णीकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ॲड. अकबर मकानदार, सचिव सुरेश केसरकर, ॲड. योगेश पाटील, ॲड. अतुल जाधव, ॲड. सचिन आवळे, ॲड. शैलजा चव्हाण उपस्थित होते.