+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही !
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Dec 22 person by visibility 585 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
किरकोळ कारणासाठी नऊ वर्षाच्या चिमुरड्या मुलाचा खून करणाऱा आरोपी विश्वास बंडा लोहार (वय ३०, रा. तिसंगी पैकी मुसलमानवाडी, ता. गगनबावडा) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एस. तांबे यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपीने प्रविण सरदार सुतार (वय ९, रा. मरळी, ता. पन्हाळा) याचा खून केल्याचा गुन्हा कोर्टात शाबित झाला. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी खटल्यात सरकारी पक्षाची बाजू मांडली. या गुन्ह्याचा तपास कळे पोलिस ठाण्याचे तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी केला होता.
  खटल्याची माहिती अशी की, सरदार तुकाराम सुतार (वय ३९, रा. मरळी, ता. पन्हाळा) यांचे मरळी फाटा येथे फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. या खटल्यातील आरोपी विश्वास लोहार आणि सरदार सुतार हे नात्याचे सख्खे मावसभाऊ आहेत. सरदार याने मावस भाऊ विश्वास याला घराच्या बांधकामासाठी ४० हजार रुपये उसणे दिले होते. सरदारच्या भावाचा अपघात झाल्यामुळे भावाच्या हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. त्याने विश्वासकडे उसने दिलेल्या ४० हजार रुपयांसाठी तगादा लावला. पण विश्वासकडून टाळाटाळ केली जात होती. त्यावरुन दोघांमध्ये वादही झाला होता.
त्या घटनेनंतर आरोपी विश्वास लोहार हा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी सरदार सुतार याच्या घरी आला होता. त्यावेळी सरदार त्याच्या दुकानात होता. सरदारच्या पत्नीने विश्वासला चहा करुन दिला. सरदारचा मुलगा प्रदीप दारात खेळत होता. त्यानंतर विश्वास दारात जाऊन बसला. त्यानंतर छोटा प्रदीप घरी आला. त्याने आईला ‘मी विश्वासकाकाबरोबर वडिलांच्या दुकानात जातो’ असे सांगून तो विश्वास यांच्यासमवेत बाहेर पडला. सायंकाळी सरदार सुतार घरी परतल्यावर पत्नीने मुलगा प्रदीप कुठे आहे असे विचारले असता तो दुकानात आला नसल्याचे सांगितले. त्यानंतर प्रदीपची शोधाशोध सुरू झाली. दरम्यान गावातील ओंकार रोहिले या मुलाने विश्वास लोहार यांच्यासमवेत प्रदीप मोटार सायकलवरुन गेल्याचे सांगितले. तसेच गावातील शिवाजी सूर्यवंशी याने विश्वासबरोबर प्रदीपला रंकाळा येथे एसटीतून जाताना पाहिल्याचे सांगितले. दरम्यान सरदारने विश्वासच्या मोबाईलवर कॉल केला असता त्याने फोन उचलला नाही. पण दुसऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवरुन कॉल केला असता त्याने तो रिसिव्ह केला. संबधित व्यक्तीने विश्वासला कुठे आहे असे विचारले असता त्याने रंकाळा स्टँड येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर सरदार सुतार गावकऱ्यासमवेत रंकाळा स्टँड येथे आल्यावर त्यांना विश्वास एकटाच आढळला. प्रदीपबाबत त्याच्याकडे विचारला केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी विश्वास लोहार याला ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस आणि नातेवाईकांनी प्रदीपचा शोध घेण्यास सुरूवात केली. दोन दिवसांनी प्रदीपचा मृतदेह रंकाळाजवळील खणीत तरंगताना दिसला. प्रदीपच्या खुनाचा आरोप ठेऊन विश्वास लोहार याच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी तपास करुन कोर्टात आरोपपत्र सादर केला.
जिल्हा न्यायाधीश तांबे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी बावीस साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे संपूर्ण केस परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होती. आरोपी विश्वासबरोबर प्रदीपला शेवटी एकत्र जाणारे साक्षीदार तपासण्यात आले. गंगावेश येथील गारवा प्रिपेड कोल्डिंक हाऊसचे मालक, सीसीटीव्ही फुटेज, संगणक तज्ज्ञांचे जबाब महत्वाचे ठरले. आरोपी विश्वास सोबत प्रदीपला पाहणारा मुलगा ओंकार रोहिले, प्रदीपची आई अनुराधा सुतार, यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. या खटल्यात एकही साक्षीदार फितूर झाला नाही. साक्षीदारांचे जबाब आणि सरकार वकील मंजूषा पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून आरोपी विश्वास लोहार याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.