+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोमेण्ट अॉफ समर चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ adjustघोडावत विद्यापीठातील ४५ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड adjustशेळेवाडीत शाहू छत्रपतींच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा !
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Jan 23 person by visibility 338 categoryलाइफस्टाइल
  महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : निसर्गात कंदमुळे देणाऱ्या अनेक वनस्पती आहेत. अशा विविध रानकंदमुळांची ओळख आणि त्यांचा आहारातील वापर याबाबतची माहिती शहरवासियांना व्हावी व शेतकऱ्यांनी या कंदमुळांची शेतात लागवड करण्याच्या हेतूने "निसर्ग अंकुरच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वुई केअर आणि एनजीओ कम्पॅशन २४ ह्या संस्थेच्या आयोजनातून १२ आणि १३ जानेवारी २०२३ रोजी ६० कंदमुळांचे प्रदर्शन भरविले आहे. शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, दसरा चौक येथे या दोन दिवसाच्या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत प्रदर्शन खुले असेल अशी माहिती संयोजक मिलींद धोंड, प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर व संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ ..अशोक वाली यांनी लिहिलेल्या "औषधी रानभाज्या - प्रथम खंड "ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ह्या प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
ह्या प्रदर्शनाचे उदघाटन कुलगुरू डॉ. श्री. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते होणार आहे. गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे,  कोल्हापूरचे कृषी अधिकारी उमेश पाटील, प्राचार्य डॉ. डी. आर. मोरे,  कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षा डॉ.  गीता पिल्लई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रदर्शनाचा सोहळा पार पडणार आहे. लोकांना कंदमुळांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी म्हणून मोहन माने यांच्या अथक प्रयत्नातून हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.  सुमारे ६० प्रकारच्या कंदाच्या जाती प्रजातींची मांडणी  प्रदर्शनात केली जाणार आहे. १५ ते २० प्रकारचे कंद विक्रीसाठी उपलब्ध असतील. ६ ते ७ प्रकारच्या
कंदांच्या पाककृती बाबतची माहिती प्रदर्शनात दिली जाणार आहे. ह्या वेळी हौशी खवय्यांना कंदांपासून तयार केलेल्या विविध पदार्थांची चवही चाखता येणार आहे. नागरिकांनी प्रदर्शनाचा लाभ अवश्य घ्यावा असे आवाहन मिलिंद धोंड ह्यांनी केले आहे.
प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, प्रोजेक्ट डायरेक्टर अमृता वासुदेवन आहेत. पत्रकार परिषदेला गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, मंजिरी कपडेकर, पल्लवी कुलकर्णी, मधुरा हावळ उपस्थित होते.या प्रदर्शनला श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था, गार्डन क्लब कोल्हापूर, युथ ऍनेक्स, वुई केअर हेल्पलाईन या संस्थांचे सहकार्य लाभले आहे.