+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ adjustव्यापार-व्यावसायिकांसाठी खुशखबर, यंदा परवाना फीमध्ये वाढ नाही ! adjustआंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला adjustमधुरिमाराजेंच्या शिवाजी पेठ परिसरातील प्रचार रॅलीने धडाकेबाज माहौल! adjustशुक्रवार - शनिवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या adjustसतेज पाटील गटाला धक्का, नेर्लीच्या सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश adjustदेवा, जोतिबाच्या नावानं चांगभल...! adjustमुश्रीफांचा विरोधकांना सवाल, राजकारणासाठी किती अपप्रचार करणार ? adjustमोदींची शनिवारी तपोवन मैदानावर सभा ! महायुतीकडून तयारी सुरू!! adjustगोकुळमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Jan 23 person by visibility 474 categoryउद्योग
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांनी दूध संघाची मुहूर्तमेढ रोवली. सहकाऱ्यांना घेऊन गोकुळ दूध संघाची स्थापना केली. त्यांनी रुजवत केलेल्या गोकुळच्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आनंदराव पाटील चुयेकर यांच्याकडे जबरदस्त ईच्छाशक्ती होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास होता. ग्रामीण भागातील दूध पुणे- मुंबईत विक्री करून शहरातील पैसा खेड्यापाड्यात आणून सर्वसामान्यांची आर्थिक उन्नती साधण्याचे त्यांचे स्वप्न साध्य झाले..."अशा शब्दात गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला.
 गोकुळ दूध संघाचे शिल्पकार माजी चेअरमन आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी (सोळा जानेवारी) अभिवादन करण्यात आले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालय परिसरातील स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. आमदार सतेज पाटील, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, माणिक पाटील चुयेकर यांच्यासह संचालक मंडळ, चुयेकर कुटुंबीय व गोकुळचा परिवार उपस्थित होता. पुतळा परिसर हारा फुलांनी सजवला होता.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आनंदराव पाटील चुयेकर यांच्यासोबत विश्वास पाटील यांनी गोकुळ दूध संघात काम केले होते. त्यांच्यासोबतच्या आठवणींना जागवत चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळ दूध संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. तसेच गोकुळच्या वाढ आणि विस्तारात स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे योगदान अधोरेखित केले.
"गोकुळच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले. लाखो दूध उत्पादक शेतकरी, २२०० कर्मचारी, दूध वाहतूकदार वितरक आणि लाखो ग्राहक असा गोकुळचा परिवार तयार झाला आहे. गोकुळच्या दर्जेदार उत्पादनांना ग्राहकांची पहिली पसंती आहे. उच्च प्रतीच्या दुधासह श्रीखंड, बासुंदी, पनीर या दुग्धजन्य पदार्थानाही मोठी मागणी आहे."असेही चेअरमन विश्वास पाटील यांनी नमूद केले.